१९८६ ते १९९७ : प्रथम नगरसेवक रहाटणी काळेवाडी
१९८६ ते १९८७ : प्रथम अध्यक्ष स्थायी समिती पिं चिं मनपा
२००३ ते २००६ : अध्यक्ष पिं चिं नवनगर विकास प्राधिकरण
२००३ ते २००६ : उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
२००६ ते २०१२ : अध्यक्ष केंद्रीय सल्लागार समिती श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार
२०१८ ते २०१९ : उपसभापती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग, महाराष्ट्र शासन
२०१८ ते २०२५ : अध्यक्ष श्री बाबासाहेब तापकीर एजुकेशन सोसायटी
२०१७ ते २०१८ : अध्यक्षा महिला बालकल्याण समिती
२०१९ ते २०२० : शहर सुधारणा समिती सदस्य
२०१७ ते २०२२ : नगरसेविका पिं चिं मनपा
समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभलेले रहाटणी-काळेवाडीतील युवा नेतृत्व म्हणजे राज सुनिता हेमंत तापकीर, राज तापकीर यांना समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू आपले आजोबा श्री बाबासाहेब धोंडीबा तापकीर, वडील श्री हेमंत बाबासाहेब तापकीर व चुलते श्री हरेश बाबासाहेब तापकीर यांच्याकडून मिळाले. त्यांचे आजोबा हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक, स्थायी समितीचे प्रथम अध्यक्ष व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे प्रथम अध्यक्ष होते.
तर त्यांचे वडील श्री हेमंत बाबासाहेब तापकीर हे केंद्रीय सल्लागार समिती श्रम रोजगार मंत्रालयाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती होते. व त्यांचे चुलते हरेश तापकीर हे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष तर आई सौ. सुनिता हेमंत तापकीर या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सभापती होत्या.
पक्षाशी एकनिष्टता व दांडगा जनसंपर्क असल्याने पक्ष श्रेष्टींनी राज तापकीर यांच्यावर मागील काही वर्षे भारतीय जनता पार्टीच्या चिंचवड विधानसभा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा दिली तसेच त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लावली व सध्या ते पिं चि शहराच्या युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
त्यामुळे समाजसेवा च राजकारण हे राज यांच्या नसानसात भिनले आहे. मागील पाच वर्षात रहाटणी श्रीनगर-तापकीरनगर प्रभागात या आगोदर झाला नव्हता तेवढा विकास त्यांच्या आई नगरसेविका सुनिता तापकीर यांनी केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा रहाटणी चौकात उभारण्यात आला. श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण, प्रभागातील डीपी रस्त्यांचा विकास, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नव्याने ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या, पेव्हिंग ब्लॉक, एलईडी पथदिवे, काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतचा बीआरटी मार्गावरील अर्बन स्ट्रीट डिझाइन तसेच त्यांच्या संकल्पनेतून फुटपाथ व सायकल ट्रॅक आधुनिक पद्धतीने विकसित केले. आदी कामे त्यांनी प्राधान्याने केली.
पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निम्मिताने रविवार दिनांक २५/०५/२०२५ रोजी महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे महाआरती व नदी घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राजमाता अहिल्याबाईंनी भारतभर अनेक मंदिरांचे बांधकाम केले,विशेषतः शिवमंदिरे बांधली. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या,त्यांच्या या कार्याचा आदर्श घेऊन व त्यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
ऑपरेशन सिंदूर मधील सर्व वीर जवानांच्या सन्मानार्थ, समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही यात्रा एकतेचा, देशभक्तीचा आणि कृतज्ञतेचा भव्य उत्सव ठरली. प्रत्येक पाऊल हे आपल्या वीर जवानांप्रती आदरभावना व्यक्त करणारे ठरले.
कार्यसम्राट आमदार.श्री.शंकर भाऊ जगताप यांच्या शुभहस्ते रामनगर कॉलनी व गारमाळा कॉलनी येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने रहाटणी परिसरातील थोपटे लॉन्स येथे ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या, ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि इतर स्थानिक समस्यांचा समावेश होता. स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत, सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले.
मंगळवार दि. २२/०४/२०२५ रोजी पहलगाम काश्मीर येथे धर्म विचारून निष्पाप निशस्त्र पर्यटकांवर हल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांचा भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ) यांच्या मार्फत मोरवाडी येथील पक्ष कार्यालय याठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शहर भाजप कार्यालय सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड, दिनांक 26 जानेवारी 2025: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेच्या पूजनाने पिंपरी-चिंचवड शहरात संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी सदस्य नोंदणी कॅम्प लावण्यात आले.युवा शक्तीला संघटित करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
माझा दृष्टीकोन म्हणजे — सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडवण्यासाठी निस्वार्थीपणे कार्य करणे. माझे उद्दिष्ट हे स्वच्छ, सुरक्षित, शिक्षित, आणि सक्षम समाज घडवणे आहे.
समाजाच्या प्रत्येक घटकाचा सन्मान, प्रत्येक घरात समाधान आणि प्रत्येक गल्लीत विकास" हेच माझं स्वप्न आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून, एक प्रगतीशील आणि प्रेरणादायी समाज निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.